मत्स्योदरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अंबड .
एम.कॉम. ची विद्यार्थिनी आरती पिराने हिला छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुवर्ण पदक मिळाले आहे. याबद्दल आरतीचा कुलगुरू डॉ. विजय फुलारी व प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे,अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना
मा. आ. राजेशभैय्या टोपे साहेब (मा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना)यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
दि.१० जानेवारी २०२६
मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड
अंबड शहरातील मत्स्योदरी पुरस्कृत महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विभाग आयोजित शाश्वत विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राचे उदघाटन मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड हस्ते संपन्न झाले.
पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,खरपुडी
शै. वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश परीक्षेमध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) करीता गुणाणूक्रमे येणाऱ्या ०५ विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ
परीक्षा दिनांक :- रविवार दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वा.
परिक्षेचे ठिकाण :- पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय खरपुडी, जालना.
पात्रता :- इयत्ता १० वी प्रवेशीत असणारे विद्यार्थी.
नोंदणी करण्यासाठी लिंक - https://forms.gle/Bs3szik2CPkaa3pJ9
अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना.
अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे भारतातील पहिल्यास्त्री शिक्षिका व महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस होते.
पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,खरपुडी
येथील पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे २२ वे वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. खरपुडी येथे शिस्त, शौर्य आणि देश प्रेमाच्या भावनेतून रुजत असलेल्या संस्काराचे दर्शन घडल्याने संपूर्ण परिसर भारावून गेला. शाळेतील एकूण ४७६ पैकी तब्बल ४३० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला प्रकारात सहभागी होवून अद्भुत दाद मिळविली.
पार्थ सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,खरपुडी
दि.22/12/25 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धा पार्थ सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकवून यश मिळविले या सर्व अकरा विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.
मत्स्योदरी विद्यालय मठपिंपळगाव ,अंबड
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील मत्स्योदरी विद्यालयाच्या इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कु. दिव्या सुभाष जिगे व कु. भैरवी दि पक जिगे या डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२५-२६ च्या लेवल एकमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
मत्स्योदरी ज्ञानमंदिर प्राथमिक शाळा, अंबड
उत्तम विचार आणि चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग असून वाचनाची सवय जोपासण्यासाठी विद्याध्यर्थ्यांनी दररोज एक गोष्टीचे पुस्तक वाचावे, आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या मित्रांना किंवा वर्गमित्रांना सांगावे, आपल्या घरी छोटेखानी वाचनालय तयार करावे, असे आवाहन मुख्याध्यापक लक्ष्मण कोळकर यांनी केले.
उत्तम विचार विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग : कोळकर